ऐकवू कविता कौतुके
एडिसन मराठी शाळेकडून नवीन उपक्रम!
मुलांना मराठी कविता, कवी ह्यांची माहिती व्हावी, भाषा आणि शब्दसंपत्ती वाढावी, सभाधीटपणा यावा, म्हणून आम्ही कविता पाठांतराचा कार्यक्रम घेऊन येतो आहोत. ह्या वर्षी या उपक्रमाला स्पर्धेचं स्वरूप दिलेलं नाही. भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक दिलं जाईल आणि विशेष चांगली म्हणाली कविता तर ' विशेष प्राविण्यासाठी' प्रशस्तिपत्रक दिल जाईल.
कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती -
तारीख- मार्च २७, २०२२
वेळ- सकाळी ११ ते दुपारी १
स्थळ- JCC
शाळेतल्या सर्व वर्गातल्या मुलांना भाग घेता येईल
वेळ मर्यादा ५ मिन.
कवितेची निवड वयानुसार असावी. कवितेच्या विषयानुरूप वेशभूषा करायला प्रोत्साहन आहे.
जागेअभावी प्रत्येक विद्यार्थ्याबरोबर एकाच पालकाला कार्यक्रम बघायला येता येईल.
चला तर मग जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊयात या मराठी कवितेच्या जल्लोषात - ऐकवू कविता कौतुके
Comments